Join us

संतोष सिवनच्या आगामी चित्रपटात शरद केळकर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 10:16 IST

अभिनेता शरद केळकरच्या शिरपेचात आता नवा तुरा लागणार आहे. सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक संतोष सिवन यांच्या आगामी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये शरद ...

संतोष सिवनच्या चित्रपटाचे मुंबईतील मड आयलँडमध्ये शूटींग सुरू झाले आहे. शरद केळकरही या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे. सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या संतोष सिवन यांनी 'रोजा', 'कालापणी', 'दिल से', 'कुछ कुछ होता है' यासारख्या चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे.शरद केळकर म्हणाला, " मी संतोष सिवन यांचा खूप मोठा चाहता आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे काम मी पाहत आलो आहे. ते एक जादुगार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप शिकायला मिळेल."