Join us

संस्कृती बालगुडेचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, अंधारातून प्रकाशाकडे वाट काढण्याचा प्रेरणादायी संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 14:57 IST

नुकताच संस्कृतीने तिचा एक मोनोक्रॉम फोटो फोटो फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी या फोटोसह तिने एक पोस्टही शेअर करत एक सकारात्मक संदेशही दिला आहे.

संस्कृती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.आता पुन्हा एक फोटो संस्कृतीने शेअर केला आहे. आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते. नुकताच संस्कृतीने तिचा एक मोनोक्रॉम फोटो फोटो फॅन्ससह सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी या फोटोसह तिने एक पोस्टही शेअर केली होती. तुम्ही चांगले आहात, त्यामुळे तुमच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी ते तुमचा मार्ग अडवू शकत नाही कारण त्यातून प्रकाश किंवा योग्य मार्ग तुम्हीच काढू शकता अशी पोस्ट तिने या फोटोसह शेअर केली. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. सांगतो ऐका या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे. सिनेमा स्वीकारताना पटकथा आणि सहकलाकारांना ती महत्त्व देते. स्वभावाशी सुसंगत सहकलाकार असतील तर चित्रीकरण रंगते आणि सेटवर चांगलं वातावरण राहतं असं संस्कृतीला वाटतं.

विशेष म्हणजे सुरुवातीला अभिनय क्षेत्रात करियर करण्याबाबत फारशी गंभीर नव्हती. त्याचवेळी अभिनेत्री सुमुखी पेंडसेने संस्कृतीला एक सल्ला दिला. तिने संस्कृतीला THE DEVILS WEARS PRADA हा हॉलीवुडचा सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संस्कृतीने हा सिनेमा पाहिला. हा हॉलीवुडचा सिनेमा पाहून आपल्यात बदल घडल्याची कबुली खुद्द संस्कृतीने दिली आहे.

टॅग्स :संस्कृती बालगुडे