Join us
Daily Top 2Weekly Top 5

खूप दिवसांनी सारं दाटून आलंय...सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय.! म्हणत संस्कृतीने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 17:26 IST

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते. संस्कृतीचा 'धरला माझा हात' हा म्युझिक व्हिडीओ  काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

संस्कृती बालगुडेचे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने शेअर केलेल्या काही फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. संस्कृतीने अलीकडेच तिचं निळ्या रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केलं आहे.  खूप दिवसांनी सारं दाटून आलंय...सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय....!” ____ प्रतिक्षा असं कॅप्शन तिने हे फोटोशूट शेअर करताना दिले आहे. संस्कृतीच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. शेवटची ती 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमात दिसणार आहे. संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत. 

टॅग्स :संस्कृती बालगुडे