Join us
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती बालगुडने रिलेशनशिप स्टेटसचं गुपित केलं उघड, कुणाला करत आहे डेट, जाणून घ्या…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 06:30 IST

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

'सांगतो ऐका' या सिनेमातून मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने मराठी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. या आधी पिंजरा या छोट्या पडद्यावरील मालिकेतील आपल्या अभिनयामुळे संस्कृती घराघरातील रसिकांची लाडकी बनली होती. आपल्या पहिल्याच सिनेमातून संस्कृतीने रसिकांची मने जिंकली. पहिल्याच सिनेमात प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्यासह स्क्रीन शेअर करत बऱ्याच गोष्टी शिकण्याची संधी संस्कृतीला लाभली. यानंतर विविध सिनेमात संस्कृतीने भूमिका साकारल्या. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. 

आपल्या जीवनातील विविध गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी शेअर करते. बऱ्याचदा संस्कृतीला सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत विचारणा होत असते. नुकतंच सोशल मीडियावरील एका पोस्टमधून संस्कृतीने तिच्या रिलेशनशिप स्टेट्सचा गंमतीशीरपणे उलगडा केला आहे. तिने एका कुत्र्याचा  फोटो शेअर केला आहे. हा कुत्रा म्हणजे चॉव-चॉव नावाच्या चायनीय केसाळ कुत्र्याची एक जात. त्यासोबत एक पोस्टही तिने लिहिली आहे. “अनेकांना प्रश्न पडला होता की मी रिलेशनशिपमध्ये आहे का?, कुणाला डेट करते आहे? तर याचं उत्तर आहे हे… हाच तो ज्याला मी डेट करत आहे. हाच माझा एकमेव बॉयफ्रेंड.” यांत तिने अभिनेत्री नेहा पेंडसे हिलाही टॅग केलं आहे. कारण नेहानेही अशाच कुत्र्यासोबतच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 

संस्कृतीच्या या पोस्टमुळे ती अजूनही सिंगल असल्याचे स्पष्ट झालं असून अनेक तरुणांचा जीव भांड्यात पडला असेल. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. सांगतो ऐका या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.

टॅग्स :संस्कृती बालगुडे