Join us

"मध्यरात्री २.३० वाजता...", अमेरिकेतून मायदेशात परतला संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला-भारतात आलात तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:28 IST

अमेरिकेतील नाटकाचा दौरा संपवून आता संकर्षण भारतात आला आहे. भारतात आलेल्या त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) नेहमीच त्याच्या हटके पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. कधी तो बस चालवताना दिसतो तर कधी थेट विमानात पायलट सीटवर असतो. संकर्षण  'नियम व अटी लागू' या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर गेला होता. अमेरिकेतील नाटकाचा दौरा संपवून आता संकर्षण भारतात आला आहे. भारतात आलेल्या त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.    गेला दीड महिना संकर्षण नाटकाच्या  दौऱ्यामुळे अमेरिकेत होते. त्याच्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अमेरिकेत असताना संकर्षणने तिथले अनेक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मायदेशात परतल्यानंतरही संकर्षणने त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

संकर्षणने हातात वडापावची प्लेट घेऊन ही पोस्ट शेअर केली आहे. संकर्षण लिहितो, ''सुप्रभात भारतात पोचलो. काल मध्यरात्री २.३० वा. मुंबईत पोचल्या पोचल्या प्रचंड भूक लागली हो.. मी काय खाललं बघा… 😜 तुम्ही खूप गॅप नंतर असे भारतात आलात तर काय खाल ..? तुम्हाला काय आवडेल..?.'' संकर्षणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही धमाल कमेंट्स केल्या आहे. 

दरम्यान संकर्षणचा नुकताच 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमाही रिलीज झाला आहे. तर सध्या त्याचे 'नियम व अटी लागू' आणि 'तू म्हणशील तसं' हे दोन्ही नाटकं जोरात सुरु आहेत. 

टॅग्स :सेलिब्रिटी