Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय जाधवचे हे आहेत ‘लकी’ कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 13:48 IST

संजय जाधवने त्याच्या सिनेमातल्या लकी कलाकारांची घोषणा केली आहे. अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती आपल्या सिनेमाचे हिरो-हिरोइन असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देअभय महाजन आणि दिप्ती सती दिसणार 'लकी' चित्रपटात'लकी' चित्रपट ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

संजय जाधवने आगामी 'लकी' सिनेमाची घोषणा केल्यानंतर त्यामध्ये कलाकार कोण असतील याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक होते. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, सोनाली खरे या कलाकारांनी तेच ‘लकी’ असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता खुद्द संजय जाधवने त्याच्या सिनेमातल्या लकी कलाकारांची घोषणा केली आहे. अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती आपल्या सिनेमाचे हिरो-हिरोइन असल्याची घोषणा संजय जाधवने सोशल मीडियाव्दारे केली आहे.

विशेष बाब म्हणजे आपल्या कलाकारांना लाँच करताना त्यांनी एक गाणेच चित्रीत केले आहे. याविषयी निर्माते सुरज सिंग म्हणाले की,'हेच तर दादांचे वैशिष्ट्य आहे. दादा नेहमी काहीतरी वेगळे करतात. त्यांनी त्यांच्या मागच्या सिनेमाचा टिझर ६० कॅमेऱ्यांनी चित्रीत केला होता. तर आता आमच्या सिनेमाचे हिरो-हिरोइन लाँच करताना हे धमाल गाणे दादांनी त्यांच्या स्टाइलने चित्रीत केले आहे. आता जेवढे गाणे एण्टरटेनिंग आहे. त्यापेक्षाही अधिक धमाल तुम्हांला चित्रपट पाहताना येईल, यावर मला पूर्ण विश्वास आहे.'

'अहो, दादा आता सांगा नंबर कुणाचा आला' या गाण्याचे गीत सचिन पाठक यांनी लिहिले आहे. तर पंकज पडघन यांनी ते संगीतबद्ध केले आहे. अमितराज, सायली पंकज आणि रोहित राऊत यांनी हे धमाल गाणे गायले आहे. उमेश जाधव यांनी या गाण्याची कोरियोग्राफी केली आहे.  

'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, अभय महाजन आणि दिप्ती सतीच्या अभिनयाने सजलेला व  संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपट ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :संजय जाधव