Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर संग्राम समेळची पत्नी श्रद्धा फाटकने इंस्टाग्रामवरील नाव ठेवले हटके, नावाची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 11:10 IST

लग्नानंतर संग्रामची पत्नी श्रद्धा हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील तिचे नाव बदलून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संग्राम समेळ नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. संग्रामच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले. इचलकरंजीला हा विवाह सोहळा पार पडला. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. संग्रामची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. २०१६ मध्ये संग्रामचे पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले. संग्रामच्या लग्नानंतर त्याची पत्नी श्रद्धा हिने सोशल मीडियावर तिचे नाव बदलून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

संग्रामची पत्नी श्रद्धा फाटक हिने लग्नानंतर सोशल मीडियावरील तिचे प्रोफाइल नाव बदलले आहे. तिने श्रद्धा संग राम असे लिहिले आहे. तिच्या या प्रोफाइल नावाची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. 

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा फाटक हिने संग्रामबद्दल भरभरून बोलली. संग्राम खूप काळजी घेतो आणि प्रेमळ असल्याचे म्हटले.

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटकापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली.स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत तो दिसला होता. या मालिकेत त्याने नील राजाध्यक्षची भूमिका साकारली होती.

संग्रामला खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या मालिकेतून. या मालिकेतील समीर या व्यक्तीरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकात काम केले. या संगीत नाटकातील त्याची सुधाकरची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 'हे मन बावरे'मध्ये संग्राम दिसला होता. संग्रामने मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅजुएशन केलं आहे. अभिनयाचे धडे त्याला घरातूनच मिळाले आहेत.

टॅग्स :संग्राम समेळ