Join us

'खर्चूनी धनराशी मोठी, जमविले तुझ्यासाठी..'; 'संगीत मानापमान' मधील नवं गाणं भेटीला, सुमीत-वैदेहीची रोमँटिक केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:54 IST

'संगीत मानापमान' सिनेमातील नवीन गाणं नीट पहा प्रेक्षकांच्या भेटीला. सुमीत राघवन-वैदेही परशुरामी यांची रोमँटिक केमिस्ट्री

'संगीत मानापमान' सिनेमाची उत्सुकता आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर या सिनेमाच टीझर रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या सुपरहिट यशानंतर अभिनेता सुबोध भावे 'संगीत मानापमान'च्या निमित्ताने पुन्हा एकदा संगीतमय सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'कट्यार..' नंतर 'संगीत मानापमान'च्या दिग्दर्शनाची धुराही सुबोध सांभाळत आहे. या सिनेमातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

'संगीत मानापमान' सिनेमातील नवं गाणं भेटीला

'संगीत मानापमान' सिनेमातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. 'नीट पहा' असं या गाण्याचं नाव असून सुमीत राघवन आणि वैदेही परशुरामी या कलाकारांची रोमँटिक केमिस्ट्री दिसून येतेय. या गाण्यात चंद्रविलास हा भामिनीसाठी त्याच्या महालात अनेक शोभिवंत वस्तूंचा नजराणा समोर ठेवतो. याच विषयावर आधारीत 'नीट पहा' हे गाणं प्रेक्षकांंचं लक्ष वेधतंय. जसराज जोशीने हे गाणं गायलं आहे. शंकर-एहसान-लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलंय.

'संगीत मानापमान' कधी रिलीज होणार?

'संगीत मानापमान' सिनेमा नवीन वर्षात अर्थात १० जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात धैर्यधराच्या भूमिकेत सुमीत राघवन, चंद्रविलासच्या भूमिकेत सुमित राघवन तर भामिनीच्या भूमिकेत अभिनेत्री वैदेही परशुरामी झळकणार आहे. याशिवाय नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर या कलाकारांचीही सिनेमात खास भूमिका आहे. 'संगीत मानापमान'च्या निमित्ताने नव्या वर्षात प्रेक्षकांना संगीतमय नजराणा ऐकायला मिळणार, यात शंका नाही.

टॅग्स :सुमीत राघवनवैदेही परशुरामीसुबोध भावे उपेंद्र लिमये