Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानची 'मराठी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 13:10 IST

चला हवा येऊ दे या मराठी रियालीटी शो मध्ये सलमान खान येणार आहे हे जगजाहीरआहे. सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या मराठी रियालीटी शोमध्ये येणार असल्याने साहजिकच त्याची मराठी ऐकण्यास प्रत्येकजण उत्सुक असणार आहे

चला हवा येऊ दे या मराठी रियालीटी शो मध्ये सलमान खान येणार आहे हे जगजाहीरआहे. सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या मराठी रियालीटी शोमध्ये येणार असल्याने साहजिकच त्याची मराठी ऐकण्यास प्रत्येकजण उत्सुक असणार आहे. सलमानला मराठी बोललेले सर्व कळते. तसेच या शोमध्ये देखील त्याने जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्याच्या घरात देखील आई आणि त्यांचे नातेवाईक मराठी बोलतात. याबद्दलचे किस्से देखील सलमानने सांगून कार्यक्रमात एक प्रकारची रंगतच आणली. सलमानचे हे मराठमोळ रूप त्याच्या चाहत्यांना आवडेल हे मात्र नक्की.