Join us

काही हातांना माझे हात पकडता आले नाही..वडिलांच्या आठवणीत भावूक झालेल्या अभिनेत्री सखी गोखलने शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 20:04 IST

सखी तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. यानंतर ती दिल दोस्ती दोबारा या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत झळकली. अभिनेत्री सखी गोखले सध्या लंडनमध्ये शिक्षणासाठी गेली आहे. मात्र तरीही सखी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. सखी तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सखीने इन्स्टाग्रामवर तिचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सखी शाळेच्या ड्रेसमध्ये उभी दिसतेय. हा फोटो शेअर करताना सखीने बाबा म्हणजेच दिगवंत अभिनेते मोहन गोखले यांच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

''याच जागी मला माझी शाळेची बस न्यायला आणि सोडायला यायची. शाळेत जाताना निरोप देणार आणि नंतर माझ्या परत येण्याची वाट पाहणारे हात मी याच जागी धरले. काही कोमल तर काही कणखर अशा हातांमध्ये माझे हात होते. पण काही हातांना माझा छोटेशे हात पकडता आले नाही. काही हात निसटले, काही हात सापडले.'' अशी भावूक पोस्ट सखीने शेअर केली आहे. 

 दिवंगत अभिनेता मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी कन्या आहे. गेल्याचवर्षी सखीने अभिनेता सुव्रत जोशीसह लग्न करत आपल्या आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी अभिनेत्री सखी गोखले लंडनला असते.

टॅग्स :सखी गोखले