Join us
Daily Top 2Weekly Top 5

सखी गोखले व सुव्रत जोशी यांचे शुभमंगल सावधान...!, पहा लग्नाचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:40 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचा विवाह सोहळा पुण्यात पार पडतो आहे. या सोहळ्यातील काही फोटो सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सुव्रत जोशीसखी गोखले यांच्या लग्नांच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता नुकताच त्यांचा फोटो समोर आला आहे. ज्यात ते दोघे विवाहबंधनात अडकले असल्याचे समजते आहे. मेहंदी सेरेमनीदेखील बुधवारी पार पडली.

या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली आहे. सखी गोखले हिरव्या रंगाच्या साडीत वधूच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. 

सखी गोखलेची मेहंदी सेरेमनी बुधवारी पार पडली व त्यानंतर त्यांची सेलिब्रेशन पार्टी देखील पार पडली. यावेळी डान्स करतानाचा त्या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सुव्रत आणि सखी गोखले यांनी दुनियादारी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्या दोघांचे सोशल मीडियावरील एकत्र फोटो किंवा कोणताही इव्हेंट किंवा कॉफी वा सिनेमाला एकत्र जाण्याचे फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी याबाबत स्वतः कधीच खुलासा केला नाही.

टॅग्स :सखी गोखलेसुव्रत जोशी