Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरूने केला तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा, जाणून घ्या ती कोणासोबत आहे नात्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:57 IST

रिंकूने इन्स्टाग्रामच्या आस्क मी ॲनिथिंगच्या माध्यमातून नुकत्याच तिच्या फॅन्ससोबत गप्पा मारल्या.

ठळक मुद्देतू सिंगल आहेस का? असे एका चाहत्यांने रिंकूला विचारले. त्यावर हो, मी सिंगल आहे असे रिंकूने उत्तर दिले.

'सैराट'मधील आर्ची उर्फ रिंकू राजगुरू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. तिने काहीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एंट्री घेतली असली तरी खूपच कमी वेळात तिला सोशल मीडियावर खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. 

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर केवळ तिचे फोटो अथवा व्हिडिओ पोस्ट करते असे नाही तर ती अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत गप्पा देखील मारते. तिने इन्स्टाग्रामच्या आस्क मी ॲनिथिंगच्या माध्यमातून नुकत्याच तिच्या फॅन्ससोबत गप्पा मारल्या. त्यावेळी तू सिंगल आहेस का? असे एका चाहत्यांने रिंकूला विचारले. त्यावर हो, मी सिंगल आहे असे रिंकूने उत्तर दिले तर तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? असे एका फॅनने तिला विचारले असता माझा कोणीही बॉयफ्रेंड नाही असे उत्तर तिने लगेचच दिले. रिंकूच्या या उत्तरांमुळे रिंकू कोणासोबतही नात्यात नसल्याचे तिच्या चाहत्यांना आता कळले आहे.

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. 

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरूने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

सैराटच्या यशानंतर रिंकू राजगुरूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता तिचा मेकअप हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरू