२०१६ साली प्रदर्शित झालेला नागराज मंजुळेंचा 'सैराट' आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. सैराट सिनेमातून आर्ची आणि परश्याची भूमिका साकारून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने प्रेक्षकांच्या मनाला गारूड घातलं. रिंकु आणि आकाशबरोबरच या सिनेमातील इतर कलाकारांनाही लोकप्रियता मिळाली. परश्याच्या मित्राची भूमिका साकारून तानाजी गालगुंडे प्रसिद्धीझोतात आला. आता तानाजी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
सैराट सिनेमामुळे तानाजीचं आयुष्यच बदलून गेलं. या सिनेमानंतर तो अनेक सिनेमांमध्ये झळकला. त्याचा चाहता वर्ग मोठा असून दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यावर्गात भर पडत आहे. तानाजी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या एका पोस्टने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तानाजीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुलीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. "Entering 2025 with" असं कॅप्शन देत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तानाजीसोबत दिसणाऱ्या या मुलीचे नाव प्रतिक्षा शेट्टी असं आहे.
हा फोटो शेअर केल्यामुळे तानाजीच्या लव्ह लाइफबद्दल चर्चा रंगल्या आहेत. तानाजीने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेमाची जाहीर कबुली दिली की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. फोटोत दिसणारी ही मुलगी त्याची गर्लफ्रेंड असल्याचंही बोललं जातं आहे.