Join us
Daily Top 2Weekly Top 5

आताच बया का बावरलं...! रिंकू राजगुरूनं शेअर केला ‘त्याचा’ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 12:58 IST

पहिलीच भेट ती...

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला रिंकूच्या ‘मेकअप’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

‘सैराट’मधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू कुणाच्या पे्रमात भलेही नसो. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची मात्र तिची भरून इच्छा होती. आर्चीची ही इच्छा अखेर पूर्ण झाली. होय, ज्याला डेट करायचे होते, त्याचीच भेट झाली आणि रिंकू सुखावली. आता हा आनंद कुणासोबत तर शेअर करायलाच हवा. रिंकूने चाहत्यांसोबत हा आनंद शेअर केला. 

रिंकूने काही दिवसांपूर्वी कलर्स टिव्हीवरील ‘एकदम कडक’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान अनेक प्रश्नांना तिने दिलखुलासपणे उत्तरे दिली होती. तुला कोणासोबत डेटवर जायला आवडेल? असे रिंकूला या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावर क्षणाचाही विलंब न लावता तिने बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत डेटवर जायला आवडेल असे उत्तर दिले होते. पण विकी कधी व कसा भेटेल, हे मात्र तिला स्वत:लाही ठाऊक नव्हते. पण अखेर तो क्षण आलाच आणि रिंकू विकीला भेटली. 

होय, नुकतीच रिंकू आणि या अभिनेत्याची भेट झाली.   विकीच्या ‘भूत’ या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगच्या निमित्ताने रिंकू व विकी एकमेकांना भेटले. या स्क्रिनिंगला रिंकूने हजेरी लावली. यावेळचा एक फोटो सुद्धा तिने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. रिंकूने शेअर केलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. चाहते या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. ‘अखेर तू त्याला भेटलीस’, असे एका युजरने म्हटले आहे. तर अन्य एकाने ‘यालाच यश म्हणतात...’ अशी कमेंट केली आहे.रिंकूने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरुन तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. तिने Ask Me Anythingच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी तू सिंगल आहेस का? असे एका चाहत्याने रिंकूला विचारले असता हो, मी सिंगल आहे असे रिंकूने उत्तर दिले

 काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. 

टॅग्स :रिंकू राजगुरू