Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सैराट' फेम तानाजीचा स्टायलिश लूक ठरतोय चर्चेचा विषय, जाणून घ्या त्याच्या याबद्दल खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 11:36 IST

तानाजीने 'सैराट' च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही त्याने दमदार भूमिका साकारत रसिकांची मनं जिकली होती. सैराटच्या यशानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रियालिटी शोजमधून दिसला.

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण  'सैराट' फेम तानाजी. त्याचेही सोशल मीडियावर नवीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून त्याने देखील इतरांप्रमाणे स्वतःच्या लूकमध्ये बदल करत चाहत्यांची वाहवा मिळताना दिसत आहे. रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल  यामुळे तानाजी सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटात इतर कलाकारांप्रमाणे तानाजी गळगुंडे देखील प्रकाशझोतात आला. तानाजी सोलापूरमधील बेंबळे या गावात राहतो. नागराज यांना या चित्रपटासाठी परश्याचा मित्र म्हणून विशेष पात्र हवं होत. त्यामुळेच तानाजीची या पात्रासाठी निवड झाली. त्याने साकारलेली भूमिका  प्रचंड भाव खाऊन गेली. त्याचे डायलॉग, नाचणं त्याचं  प्रत्येक अंदाज रसिकांना भावला 'सैराट'मुळे तानाजीचे संपूर्ण आयुष्यच पालटलं. त्यामुळेच सैराटमधील कलाकार तानाजीची देखील अवघ्या महाराष्ट्राचा लाडका अभिनेता बनला. ब-याच दिवसांपासून तानाजीची चर्चा नाही मात्र सोशल मीडियावर तो सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतेच इंस्टाग्रामवर त्याने त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या लूकमध्येही कायापालट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

तानाजीने 'सैराट' च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही त्याने दमदार भूमिका साकारत रसिकांची मनं जिकली होती. सैराटच्या यशानंतर तो ‘द कपिल शर्मा शो’, ‘ड्रामा कंपनी’, ‘कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस’, ‘सा रे गा मा पा’ यांसारख्या रियालिटी शोजमधून दिसला. कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी मध्ये स्कीट्सही त्याने केले होतं. तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या  'अगडबम' या सिनेमात तो 'वजने' नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसला होता.