Join us

सैराटचा प्रिमियर बर्लिनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 01:46 IST

 मराठी इंडस्ट्रीला सध्या चार चॉंद लागले आहेत. मराठी चित्रपट व मराठी कलाकारांची धूम देखील संपूर्ण भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील दिसते.नागराज ...

 मराठी इंडस्ट्रीला सध्या चार चॉंद लागले आहेत. मराठी चित्रपट व मराठी कलाकारांची धूम देखील संपूर्ण भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील दिसते.नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच सातासमुद्रापलीकडे उडी मारली आहे. कारण नुकत्याच या चित्रपटाची अधिकृत निवड ६६ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात झाली आणि त्याचा दिमाखात वर्ल्ड प्रिमियर देखील झाला.तसेच या  प्रिमियरचा आनंद नागराज मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ते म्हणाले, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील हा प्रिमियर हजार ते बाराशे प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. शिवाय या चित्रपटाला झालेली ही गर्दी पाहून मन भरून आहे.तसेच हा क्षण देखील माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. त्याचबरोबर सैराट प्रदर्शित करण्यासाठी मी खूप उत्सुक देखील आहे.