Join us

सई ताम्हणकरचा हा सेल्फी तुम्ही पाहिला?, तुम्हीसुद्धा व्हाल फिदा…!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 08:00 IST

सई सध्या सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'पाँडेचेरी' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग निसर्गरम्य पाँडेचेरीमध्ये होणार आहे.

''जपून जपून जा रे पुढे धोका'' आहे म्हणत रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सई सध्या छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोच्या जजच्या भूमिकेत झळकत आहे. सई सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. सोशल मीडियापासून दूर असल्याने तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट्स किंवा फोटो तसंच व्हिडिओ पाहायला मिळत नव्हते. त्यामुळे चाहते काहीसे हिरमुसलेले होते. मात्र आता याच सईच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. सईचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. 

कमीत कमी मेकअप, विस्कटलेले केस आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज असलेला सईचा सेल्फी कुणालाही घायाळ करेल. सई सोशल मीडियापासून काही दिवस दूर असली तरी या सेल्फीमुळे तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा चांगलीच फळाला आली आहे. सई सध्या सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'पाँडेचेरी' चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाचं शुटिंग निसर्गरम्य पाँडेचेरीमध्ये होणार आहे. या चित्रपटात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.