Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कार्यक्रमात हजेरी लावणार सई ताम्हणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 17:22 IST

प्रसिद्ध चॅट शो, फेमसली फिल्मफेअर आता लवकरच नवीन येणार्‍या एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून स्ट्रीमिंग चालू करत आहे.

प्रसिद्ध चॅट शो, फेमसली फिल्मफेअर आता लवकरच नवीन येणार्‍या एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून स्ट्रीमिंग चालू करत आहे. या कार्यक्रमाच्या मराठी आवृत्तीमध्ये सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी आणि रिंकू राजगुरू यांसारख्या तारकांचा समावेश असेल.

मराठी चित्रपटांना गेल्या काही वर्षांमध्ये उत्तम ओळख मिळालेली असून त्याचे श्रेय कुशल दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, गायक या सर्वांना जाते कारण त्यांच्या मेहनतीमुळेच चित्रपट आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मराठीमधून अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम तयार होत आहेत.

 नवीन येणारा ओटीटी प्लॅटफॉर्म हा प्रांतिक प्रेक्षकांना पंजाबी, बंगाली, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम अशा त्यांच्या भाषेमधील कार्यक्रम तसेच हिंदी आणि इंग्रजीमधून सादर करण्याचा उद्देश ठेवून आहे. वैयक्तीकृत मूळ कार्यक्रम तसेच लायसंस्ड/परवानाकृत कार्यक्रम जसे की, वेब सीरीज, गेम शो, चॅट शो, चित्रपट अशा अनेक माध्यमांमधून वेगवेगळ्या भाषेमधून एमएक्स प्लेअर ओटीटीमध्ये मूलभूत बदल करत भारतभरामधील प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा मानस बाळगून आहे.

 या कार्यक्रमाचे स्वरूप अतिशय खेळीमेळीचे आणि हलकेफुलके असून यामध्ये सिनेस्टार त्यांच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल, गमतीशीर आठवणींबद्दल आणि त्यांच्या आयुष्यामधील काही मजेदार बाबींबद्दल बोलतील, ज्याद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहण्याची संधी मिळेल. प्रत्येक आठवड्याला एक नवीन स्टार प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्यांचे फॅन त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊ शकतील.

टॅग्स :सई ताम्हणकरस्वप्निल जोशी