Join us

सई ताम्हणकरला ह्या कारणामुळे झाला होता प्रचंड मानसिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 18:14 IST

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नुकतेच एका वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागले.

ठळक मुद्देसईचा हरवला होता फोनसईचे मोबाईलमधील फोटो झाले होते लीक

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नुकतेच एका वाईट प्रसंगाला तोंड द्यावे लागले. ती एका चित्रीकरणात व्यग्र असताना सेटवरून तिचा मोबाईल हरवला होता. त्यानंतर तिला तिचा मोबाईल सापडला. मात्र त्यातील तिचे काही फोटो लीक झाल्याचे तिच्या लक्षात आले. ही माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे.

सईने सोशल मीडियावर या वाईट प्रसंगाबाबत एका व्हिडिओमार्फत सांगितले आहे. तिने सांगितले की, सध्या एका वेबसीरिजसाठी मी मुंबईबाहेर शूटिंग करते आहे. गेले काही तास माझ्यासाठी प्रचंड मानसिक त्रासाचे होते. मी सेटवर माझा फोन हरवला आणि त्यानंतर माझ्या मोबाईलमधल्या वैयक्तिक गोष्टी, माझे फोटो लीक होऊ लागले. सुरूवातीला मला असे वाटलं की, कोणीतरी माझी मस्करी करत आहे. पण नंतर त्यातील गांभीर्य मला कळू लागले आणि माझे कामातले लक्षच उडाले. दिवसाच्या शेवटी माझा फोन मिळाला. मात्र फोनच्या मागे दोन मोठे ओरखडे आले होते. या सगळ्या टेन्शनमध्ये माझ्या चाहत्यांनी, हितचिंतकांनी आणि मीडियाने दिलेल्या पाठिंब्यासाठी मी सर्वांचे खूप आभार मानते.

अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘डेट विथ सई’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याबाबत सई ताम्हणकर म्हणाली, डेट विथ सई सारखी थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामुळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. वेबसीरिजच्या विश्वात डेट विथ सईने मी पाऊल ठेवत आहे. आणि डिसेंबरमध्ये येणा-या ह्या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकर