Join us

सांगलीची सई ताम्हणकर आता झाली 'मुंबईकर', पाहा आलिशान घराचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 13:05 IST

Sai Tamhankar : मुळची सांगलीची असलेल्या सईने मुंबईत स्वतःचं पहिलं घर घेतलं आहे. या घरात ती नुकतीच राहायला गेली असून तिने सोशल मीडियावर सामान शिफ्ट करताना व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे. सईने नुकतेच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी काय असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही  उत्सुक असाल ना.. तर मुळची सांगलीची असलेल्या सईने मुंबईत स्वतःचं पहिलं घर घेतलं आहे. या घरात ती नुकतीच राहायला गेली असून तिने सोशल मीडियावर सामान शिफ्ट करताना व्हिडीओदेखील शेअर केला आहे. 

सई ताम्हणकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'अकरावं ठिकाण... पुन्हा घाबरून आणि उत्साहानं, मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक स्वप्न पूर्ण झालं. माझं पहिलं मुंबईतलं घर, एक मैलाचा दगड गाठला, घरी बोलावण्याचं ठिकाण, जिथे आठवणी विणल्या जातील. पण आनंदादरम्यान, एक कडू आठवण. एकेकाळी जे माझं घर होतं त्याला मी निरोप देताना, परिचित भिंती आणि जुन्या निवासस्थानाचा निरोप घेतेय, ज्या ठिकाणी मी एकेकाळी आरामात राहिले होते ते सोडते आहे. 

तिने पुढे म्हटले की, प्रत्येक खोली बांधताना आठवणी कुजबुजतात, हास्याचे आणि फुललेल्या क्षणांचे प्रतिध्वनी, भिंतींवर भूतकाळातील कथा आहेत, काळामध्ये कोरलेल्या, भावनांचा सिम्फनी, एक गुंफणारा यमक. पण मी पुढे या नवीन अध्यायाला सुरुवात करत असताना, विनम्र कृतज्ञतेनं माझं मन भरून आलंय. केलेल्या आठवणी आणि शिकलेल्या धड्यांसाठी, या नवीन घरात, नवीन स्वप्नं विणली जातील. म्हणून मी कृतज्ञ आलिंगन देऊन निरोप घेते. मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक प्रकाशाचा किरण.' सई ताम्हणकरच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सईच्या नवीन घरासोबत तिने तिचे स्वतःचे युट्यूब चॅनेलदेखील सुरू केले आहे.
टॅग्स :सई ताम्हणकर