रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत सई ताम्हणकरने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. म्हणूनच आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून तिची गणना होते.
मिमीच्या शूटिंग दरम्यान सई ताम्हणकरच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. मात्र तरीही अशा परिस्थिती सईने शूटिंग पूर्ण केले होते. मिमी हा सिनेमा 'मला आई व्हायचंय' या मराठी सिनेमावर आधारित आहे. त्यामुळे सिनेमात काहीसा भावनिक अँगलही पाहायला मिळेल.
यात क्रिती सॅनन सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतायेत. 2020मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.