सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशीची जमली जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 14:26 IST
सई ताम्हणकरने आज तिच्या अभिनयाने मराठी इंडस्ट्रीत तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे तर जितेंद्र जोशीने त्याच्या आजवरच्या ...
सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशीची जमली जोडी
सई ताम्हणकरने आज तिच्या अभिनयाने मराठी इंडस्ट्रीत तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे तर जितेंद्र जोशीने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. सई आणि जितेंद्र यांनी दुनियादारी या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे हा जितेंद्रच्या तोंडी असलेला संवाद खूपच गाजला होता. या चित्रपटातील जितेंद्र आणि सई या दोघांच्याही अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. सई आणि जितेंद्र या दोघांचे या चित्रपटात अनेक एकत्र सीन होते. त्यावेळी या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता ते पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास सज्ज झाले आहे.सुहृद गोडबोलेने बाजी या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता सुहृद गोडबोले प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत असून या चित्रपटाची घोषणा त्याने नुकतीच ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे केली आहे. त्याने फेसबुकला त्याच्या नव्या टीमसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसोबत आमच्या नवीन प्रोजेक्टची पहिली रिडिंग असे लिहिले आहे. तसेच अनेक हुशार लोक माझ्या या चित्रपटाच्या टीमशी संबंधित असल्याचे देखील म्हटले आहे. सुहृद गोडबोलेने पोस्ट केलेल्या फोटोत आपल्याला सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, निखिल महाजन, अक्षय बर्दापूरकर, राहुल पिल्लई यांना पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे सई आणि जितेंद्र एकत्र झळकणार असल्याचे आपल्याला कळून येत आहे. चित्रपटाची आणखी माहिती देणे सुहृतने टाळले आहे.