Join us

सचिन पिळगांवकरांची हिंदी वेब सिरीजमध्ये मनोरंजक भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 13:18 IST

हिंदी सिनेसृष्टीत नेहमी नवीन विषय हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. आता हिंदीमध्ये एक नवीन वेब सिरीज येत आहे ज्यामध्ये लैंगिक शिक्षण किती महत्त्वाचे या विषयावर गमतीशीर पध्दतीने भाष्य करण्यात आले आहे. बहुतेकशा शाळेत लैंगिक शिक्षण दिले जात नाही आणि जरी दिले तरी ते योग्य पद्धतीने मुलांपर्यंत पोहचतेच असं नाही

हिंदी सिनेसृष्टीत नेहमी नवीन विषय हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. आता हिंदीमध्ये एक नवीन वेब सिरीज येत आहे ज्यामध्ये लैंगिक शिक्षण किती महत्त्वाचे या विषयावर गमतीशीर पध्दतीने भाष्य करण्यात आले आहे. बहुतेकशा शाळेत लैंगिक शिक्षण दिले जात नाही आणि जरी दिले तरी ते योग्य पद्धतीने मुलांपर्यंत पोहचतेच असं नाही.  चुकीचा माहितीचा स्त्रोत हा मुलांसाठी अयोग्य असू शकतो. या अशा आगळ्या-वेगळ्या विषयावर भाष्य करणारी ‘सेक्स चॅट विथ पप्पू अँड पप्पा’ हा वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

या वेब सिरीजच्या बातमी मागील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले महागुरु अर्थात अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या वेब सिरीजमध्ये 'दादू विश्वनाथ वत्सा' ही भूमिका साकारली आहे. सचिन सरांनी हिंदी चित्रपटात काम केले आहे. उदा. जाना पहचाना, ऐसी भी क्या जल्दी है, अभी तो मैं जवान हूँ, सत्ते पे सत्ता, शोले आदी. आता या नवीन हिंदी वेब सिरीजमधून त्यांची नवीन मजेशीर, मनोरंजक भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.