Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन पिळगांवकरांनी गायलं ५० वर्ष जुनं गाणं, श्रियाने शेअर केला वडिलांचा गातानाचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:36 IST

श्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन हे आपल्या सुमधुर आवाजात एक आयकॉनिक गाणे गाताना दिसत आहेत.

मराठी सिनेसृष्टीचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगांवकर हे आपल्या कलेने आजही चाहत्यांना भुरळ घालत असतात. नुकताच सचिन पिळगांवकर यांचा एक अत्यंत सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांची कन्या आणि अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने वडिलांसोबतच्या प्रवासातील एक खास क्षण टिपला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन हे आपल्या सुमधुर आवाजात एक आयकॉनिक गाणे गाताना दिसत आहेत.

श्रियाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील सुपरहिट हिंदी चित्रपट 'गीत गाता चल' मधील 'गीत गाता चल ओ साथी...' हे गाणे गुणगुणताना दिसत आहेत. श्रियाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, "जेव्हा मी माझ्या वडिलांबरोबर प्रवास करते, तेव्हा आपण एखाद्या ठिकाणाचं जे सौंदर्य अनुभवतो, ते त्यांच्या गाण्यांतून सुंदरपणे व्यक्त होते. हे मला खूप आवडते".

कलाकारांकडून कौतुकाचा वर्षावश्रियाच्या या पोस्टवर केवळ चाहतेच नाही, तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट्स करत कौतुक केले आहे. निवेदिता सराफ, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडेकर, स्वप्नील जोशी आणि फुलवा खामकर यांसारख्या कलाकारांनी सचिनजींच्या या सदाबहार आवाजाला दाद दिली आहे.

श्रिया पिळगांवकर स्वतः एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. वेब सीरिज आणि चित्रपटांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रिया लवकरच 'हैवान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती अनेकदा आई सुप्रिया पिळगांवकर आणि वडील सचिन पिळगांवकर यांच्यासोबतचे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sachin Pilgaonkar sings old song, daughter Shriya shares video.

Web Summary : Actor Sachin Pilgaonkar's singing video went viral. Daughter Shriya shared the video of him singing 'Geet Gaata Chal' during a trip. Celebrities praised Sachin's evergreen voice. Shriya will soon be seen in the film 'Haivan'.
टॅग्स :सचिन पिळगांवकरश्रिया पिळगावकर