Join us

​‘सोहळा’ या चित्रपटाच्या निमित्ताने जमली सचिन पिळगांवकर आणि शिल्पा तुळसकर यांची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 09:52 IST

प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया, सुरेश गुंडे यांच्या अरिंहत फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘सोहळा’ ...

प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया, सुरेश गुंडे यांच्या अरिंहत फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘सोहळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलचे चित्रीकरण नुकतेच मड आयलंड येथे पार पडले. या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आहेत. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी अभिनेता सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळसकर, आस्था खामकर, लोकेश गुप्ते यांच्यावर एक पार्टी साँग चित्रीत करण्यात आले. या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटांविषयी माहिती देताना सांगितले, चित्रपटाचे कथानक हे आजच्या माइक्रो फैमिली युगातील आहे. नातेसंबंधात झालेला बदल दाखविण्याचा आगळावेगळा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटात सचिन आणि शिल्पाने मुख्य भूमिका साकारली आहे तर या चित्रपटात विक्रम गोखले, लोकेश गुप्ते, मोहन जोशी यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘जिदंगी ही गोल गोल आहे...’ या पार्टी साँगचे चित्रीकरण करताना अभिनेते सचिन पिळगांवकर खूपच उत्सुक होते. ते सांगतात, या चित्रपटांच्या शेड्यूलचा शेवटचा दिवस होता. या चित्रपटात शिल्पा तुळस्कर माझ्या नायिकेच्या भूमिकेत आहे. आमच्या दोघांवर हे पार्टी साँग चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटांविषयी सांगायचे झाले तर मी इतकेच सांगेल की चित्रपटाच्या नावातच सिनेमाची कथा लपलेली आहे. नात्या-गोत्यांच्या संबंधातील हा एक आगळावेगळा सोहळा आहे. जुन्या काळी सर्व कुंटुंब एकत्र राहत असे आणि आता या मॉर्डन युगात कुटुंबाला माइक्रो फैमिलीचे रूप प्राप्त झाले आहे. हा चित्रपट घरांतील प्रत्येकासाठी एक ‘सोहळा’ आहे.अभिनेत्री शिल्पा तुळस्करने या चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगांवकर आणि गजेंद्र अहिरे यांच्यासोबत मी काम करत आहे. आमच्या तिघांची ट्यूनिंग खूपच चांगली जुळली आहे आणि त्याचमुळे हा सिनेमा फारच सुरेख आणि उत्तम प्रकारे बनला आहे. घरातील प्रत्येकासाठी हा सिनेमा नक्कीच खऱ्या अर्थाने एक सेलिब्रेशन म्हणजेच सोहळा ठरणार आहे.Also Read : ​सचिन पिळगांवकर यांची नवीन गाडी तुम्ही पाहिली का?