Join us
Daily Top 2Weekly Top 5

Royal लूकमध्ये दिसली आरोह वेलणकरची पत्नी,Reception वेळी दोघांचा असा होता अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 12:00 IST

लग्नानंतर आरोहने सोशल मीडियावर पत्नी  अंकितासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याने पत्नीविषयीचे त्याचे प्रेम व्यक्त केले होते. ...

लग्नानंतर आरोहने सोशल मीडियावर पत्नी  अंकितासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याने पत्नीविषयीचे त्याचे प्रेम व्यक्त केले होते. लग्नात नववधू अंकिताचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळाले होते.आकर्षक साडीमध्ये तिचे सौदर्य आणखी खुलल्याचे पाहायला मिळाले होते.लग्नात कॅमे-यात टीपलेले खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आता आरोहच्या वेडींग रिसेप्शनचे काही खास फोटो समोर आले आहेत. आरोह आणि अंकिताचा या फोटोंमध्ये रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.आरोह वेलणकर 11 डिसेंबरला अकिंता शिंगवीसह विवाबबंधनात अडकला.विशेष म्हणजे आरोह हा मराठी तर अंकिताही मारवाडी असल्यामुळे अंकिताच्या पारंपारिक पद्धतीनुसार म्हणजेच मारवाडी पद्धतीने या दोघांनी लग्न केले.यावेळी या लग्नसोहळ्याला आरोह आणि अंकिताचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळाली होती.आरोहनेसुद्धा आपल्या लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूट केले होते.या फोटोशूटसाठी त्याने बॉलिवूडच्या विविध गाजलेल्या सिनेमांच्या सेटचा वापर केला होता.'जोधा अकबर', 'प्रेम रतन धन पायो' यासारख्या विविध सिनेमांच्या सेटवर आरोह आणि अंकिताचे प्री-वेडिंग फोटोशूट झाले आहे.या फोटोत आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. अंकिता आणि आरोहची एकाच कॉलेजमध्ये होते त्यामुळे कॉलेजमध्येच दोघांची एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने ओळख झाली होती. हळुहळु दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले.गेली अनेक वर्ष दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखत होते त्यामुळे कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी लग्न केले.आरोह अभिनेता असण्यासोबतच इंजीनिअरसुद्धा आहे.त्यामुळेच आपल्या लग्नासाठी त्याने खास मोबाईल अॅपही तयार केले होते.आरोह वेड्स अंकिता या अॅपद्वारे लग्नात घडणा-या प्रत्येक गोष्टीचे अपडेट निमंत्रितांना कळणार होते. cnxoldfiles/a>सचिनच्या होणाऱ्या पत्नीचे नाव पियुषा बिद्नुर आहे.पियुषाचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही.खुद्द सचिनेच त्यांच्या साखरपुड्याची गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.