Join us

​प्रेमाची नशा चढवणाऱ्या 'ड्राय डे'चे रोमँटिक साँग लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 15:12 IST

प्रेमाची नशा 'ड्राय डे' या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आनंद सागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि ...

प्रेमाची नशा 'ड्राय डे' या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आनंद सागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या सिनेमातील 'अशी कशी' हे रोमँटिक गाणे सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले. हे गाणे लाँच झाल्यानंतर काहीच तासात प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया या गाण्याला मिळत आहेत. प्रेमाच्या दुनियेची रंगीत सफर या गाण्यातून घडून येत आहे. ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेश जोडीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. नव्याने प्रेमात पडलेल्या युगुलांना हे गाणे आपलेसे करीत आहे. जय अत्रे लिखित या गाण्याला हिंदीचे सुप्रसिद्ध गायक जोनीता गांधी आणि अॅश किंग यांचा गोड आवाज लाभला आहे. जोनीता आणि अॅश यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत. पण मराठी चित्रपटात गाण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. या दोघांनी हे गाणे खूपच चांगल्या प्रकारे गायले आहे. शिवाय या गाण्याचे चित्रीकरण काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी झाले असून श्रीनगरच्या आल्हाददायी निसर्गाचा अनुभव या गाण्यातून रसिकांना घरबसल्या घेता येणार आहे.थोडक्यात काय तर, 'ड्राय डे' या शीर्षकाला साजेल असा हा सिनेमा असून प्रेमाची नशा मद्याहून अधिक सरस असल्याची जाणीव 'अशी कशी' हे गाणे करून देते. येत्या १० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या आगळ्या वेगळ्या 'ड्राय डे' या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून नितीन दीक्षित यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांचे आहे. 'ड्राय डे' या चित्रपटात ऋत्विक आणि मोनालिसा या नव्या जोडीसोबतच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिरे, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.Also Read : मोनालिसा बगलच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये वाढ