रोमँटिक कॉमेडी 'मिस यू मिस'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:55 IST
मराठी चित्रपटात अनेक विविध विषय हातोटीने साकारले जात असल्याचं कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे. मग ते कॉमेडी असो, रोमँटिक असो, ...
रोमँटिक कॉमेडी 'मिस यू मिस'
मराठी चित्रपटात अनेक विविध विषय हातोटीने साकारले जात असल्याचं कौतुक सगळ्यांकडूनच होत आहे. मग ते कॉमेडी असो, रोमँटिक असो, हॉरर असो वा सोशल असो. असाच आणखी एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येत आहे 'मिस यू मिस' आहे ना वेगळा विषय.. या रोमॅंटिक कॉमेडी जॉनर असलेल्या चित्रपटाची स्टोरी आपल्याला आपण शेवटचं 'सॉरी, मिस यू, डोंट मिस' हे साधे-साधे पण तसे जरूरीचे प्रश्न कधी बोललो होतो हे आठवायला भाग पाडते. हा चित्रपट श्याम निंबाळकर यांनी दिग्दर्शित केला असून, भाग्येश देसाई यांनी कथा लिहिली आहे. तर या चित्रपटात मोहन जोशी, अश्विनी एकबोटे आणि भाग्येश देसाई आदी कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.