Join us

​सचिन पिळगांवकर कैदी बँड या चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 16:25 IST

यश राज बॅनरच्या कैदी बँड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चांगलीच चर्चा रंगली ...

यश राज बॅनरच्या कैदी बँड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चांगलीच चर्चा रंगली आहे. एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरवरून आपल्याला दिसून येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर देखील दिसत आहे. या चित्रपटात ते पोलिसांच्या भूमिकेत असून या चित्रपटातील त्यांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. सचिन पिळगांवकर यांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टीत नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ते केवळ एक अभिनेते नव्हे तर एक उत्कृष्ट दिग्दर्शक, निर्माते आणि गायक आहेत. कैदी बँड या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्मसची असून या चित्रपटाचे दिग्दर्शन हबिब फैजल यांनी केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अंडरट्रायल कैद्यांची कथा पाहायला मिळणार आहे. अंडरट्रायल कैदी म्हणजे आरोपींची केस न्यायालयात सुरू आहे. पण त्यावर अजून कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सचिन पिळगांवकर कैद्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. ते कैद्यांना सांगत आहेत की, 15 ऑगस्टला आपल्या कारगृहात एक आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदाच स्त्री आणि पुरुषांचा बँड बनवला जाणार असून हा बँड परफॉर्म करणार आहे. इंटरनॅशनल दर्जाचा हा बँड असणार असल्याचे ते कैद्यांना सांगत आहेत. कैदी बँड या चित्रपटातील सचिन पिळगांवकर यांचा लूक खूपच वेगळा आहे. या चित्रपटात त्यांनी पोलिसांची वर्दी घातली असून या चित्रपटात पांढरे केस आणि मिशी असा त्यांचा लूक असणार आहे. आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. Also Read : अशी जमली सचिन पिळगांवकर-सुप्रिया पिळगांवकरची जोडी​