Join us

रोहित शेट्टीने सिद्धार्थ जाधवसोबत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 19:53 IST

अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या आगामी चित्रपट सिम्बाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या आगामी चित्रपट 'सिम्बा'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून या सिनेमात अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यंदा सिद्धार्थ दिवाळी सिम्बाच्या सेटवरच साजरी करणार आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना सेटवरून व्हिडिओच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. विशेष बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत रोहित शेट्टीने दिवाळीच्या शुभेच्छा मराठी अंदाजात दिल्या आहेत. 

सोशल मीडियावर सिद्धार्थचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सिद्धार्थ आणि रोहित गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांनी एकत्र बऱ्याचदा काम केले आहे. त्यांची ही मैत्री या व्हिडिओतही पाहायला मिळते. ‘तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आगामी सिम्बा चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे,’ अशी गंमत रोहित करत असतानाच सिद्धार्थ म्हणतो, ‘नाही नाही, रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी हे दोघेच मुख्य आहेत.’

 

काही दिवसांपूर्वी ‘सिम्बा’च्या सेटवरच सिद्धार्थचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला होता. सेटवर त्याचा वाढदिवस धमाकेदार पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगने उचलली होती. त्याचासुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

सिम्बा' हा  चित्रपट साऊथच्या 'टेम्पर' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र 'सिम्बा'मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. सिम्बा या चित्रपटात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या २८ डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.  

टॅग्स :सिद्धार्थ जाधवरोहित शेट्टी