Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित राऊत - जुईली जोगळेकरने दिले ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 13:41 IST

मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांनी एक नवीन चॅलेंज सध्या सोशल मीडियावरून सध्या आपल्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींना दिले आहे.

ठळक मुद्देरोहित राऊत - जुईली जोगळेकरने दिले सरगम गाऊन दाखवण्याचे चॅलेंजया चॅलेंजला मिळतोय अप्रतिम प्रतिसाद

बऱ्याचदा सिनेमा रिलीज होण्याच्यावेळी त्या सिनेमाचे अभिनेता-अभिनेत्री आपल्या चाहत्यांना काहीतरी चॅलेंज देऊन सिनेमाविषयी उत्सुकता वाढवताना दिसतात. पण संगीत क्षेत्रातली मंडळी फारच क्वचित असे काही नाविन्यपूर्ण चॅलेंजेंस घेऊन येतात. मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांनी एक नवीन चॅलेंज सध्या सोशल मीडियावरून सध्या आपल्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींना दिलेले आहे. ‘सरगम टंग ट्विस्टर चॅलेंज’ असे या चॅलेंजचे नाव आहे.

रोहित-जुईलीने नुकताच एक व्हिडीयो आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. तशी सरगम गाऊन दाखवण्याचे चॅलेंज त्यांनी दिलेले आहे. अभिनेता सुयश टिळकसह फिल्मइंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनी हे चॅलेंज स्विकारून सरगम गातानाचे आपले व्हिडीयोजही अपलोड केले आहेत. या चॅलेंजविषयी रोहित राऊत सांगतो की, “माझ्या सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींनी आजपर्यंत मला सोशल मीडियावरून वेगवेगळी चॅलेंजेस दिली आहेत. ही चॅलेंजेस स्विकारणे खूप मजेशीर असते आणि मला आवडते. बऱ्याच दिवसापासून मलाही माझ्या चाहत्यांना आणि नॉन-सिंगर मित्र-मौत्रिणींना असे काही मनोरंजक चॅलेंज द्यावे, असे वाटत होते. मग जुईलीने मला ही कल्पना सुचवली आणि मी आणि जुईलीने हे सरगम टंग-ट्विस्टर चॅलेंज आमच्या मित्र-मैत्रिणींना आणि सोशल मीडिया फॉलोवर्सना दिले. सध्या या चॅलेंजला अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे.’’

टॅग्स :रोहित राऊत