Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋत्विकचे "मोहे पिया" हे नाटक थिएटर ऑलम्पिक महोत्सवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 09:46 IST

छोट्या पडद्यावरील "मानसिचा चित्रकार तो" ही मालिका आपल्या सगळ्यांनाच चांगल्याच परिचयाची आहे. या मालिकेत "विहान"ची भूमिका साकारणारा ऋत्विक केंद्रे ...

छोट्या पडद्यावरील "मानसिचा चित्रकार तो" ही मालिका आपल्या सगळ्यांनाच चांगल्याच परिचयाची आहे. या मालिकेत "विहान"ची भूमिका साकारणारा ऋत्विक केंद्रे अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांचा लाडका बनला त्याच्या भूमिकेमुळेच त्याने रसिकांचे यश संपादन केले.सुप्रसिद्ध  नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचे बाळकडू  घरातून लाभले होते.लहानपानपासूनच अभिनयाचे संस्कार झाले असल्यामुळे  ऋत्विक जाहिरात, नाटक, मालिका, सिनेमा या क्षेत्रांमध्ये अगदी बिनधास्त वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋत्विकला नाटकांचीही सिनेमा आणि मालिकांइतकीच  आवड आहे. कॉलेजमध्ये असताना ऋत्विकने अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता. बऱ्याचदा कॉलेजमध्ये रंगणारी नाटके ही गुजराती आणि इंग्रजी भाषेतील नाटकांमध्ये त्याने काम केले आहे."झुलवा" या प्रायोगिक नाटकापासून आपल्या रंगभूमीवरच्या करिअरची सुरवात केली. त्याचबरोबर  ऋत्विकने “लुक्का छुपी”, “मेरा बेटा चोर है”, “वो चार पन्ने” या हिंदी तर “गोची  शाकुंतल” या इंग्रजी तसेच  गुजराती “जयंतीलालनी सायकल” अशा विविध नाटकांमध्ये अभिनय केला आहे. ऋत्विकच्या "मोहे पिया", या हिंदी नाटकासह त्याच्या इंग्रजी नाटक "ओ माय लव्ह" याबरोबरच मराठीतील "प्रिया बावरी" या नाटकांचे  ४१० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. "मोहे पिया" या ऋत्विकच्या हिंदी नाटकाने थिएटर ऑलम्पिक महोत्सवाची सुरुवात होणार आहे.या महोत्सवाचे आठवे वर्ष असून पहिल्यांदाच भारतात होणार आहे.येत्या २४ मार्चला थिएटर ऑलम्पिक महोत्सव वरळीतील नेहरू सेंटर येथे हा महोत्सव रंगणार आहे."मोहे पिया" या नाटकाचे दिग्दर्शन वामन केंद्रे यांनी केले असून गौरी केंद्रे या निर्मात्या आहेत.  ऋत्विक हा सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा आहे.गेल्याचवर्षी प्रदर्शित झालेला 'ड्राय डे' या सिनेमातून त्याने सिनेमातही पदार्पण केले होते.'छोट्या पडद्यापासून सुरुवात जरी केली असली तरी, माझा अभिनय अधिक चांगला कसा होईल, यासाठी मी काहीकाळ ब्रेक घेतला होता. या सिनेमात काम करण्याआधी मी स्वतःमध्ये अनेक चांगले बदल घडवून आणले आहेत. शिवाय यादरम्यान मार्शल आर्ट्सचे शिक्षण घेऊन, स्वतःमधील कलाकाराला अधिक चालना देण्याचा प्रयत्न केला आहे असेही त्याने सांगितले.