Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ऋत्विक केंद्र दिसणार 'सरगम' मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 13:11 IST

"मानसीचा चित्रकार तो" या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रे यांने मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपट  सृष्टीत  आपलं वेगळं नाव ...

"मानसीचा चित्रकार तो" या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रे यांने मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपट  सृष्टीत  आपलं वेगळं नाव निर्माण केलं आहे. ऋत्विकचं मोहे पिया हे हिंदी नाटक संपुर्ण देशभरात गाजत आहे. अशातच  ऋुत्विकच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे ऋुत्विकचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  ऋत्विकने आपल्या फेसबुक पेजवरुन  "सरगम" या सिनेमाचं ऑफिशल पोस्टर शेअर केलं आहे. "सरगम" या सिनेमात या सिनेमात ऋत्विक मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातील ऋत्विकची भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पोस्टरवर ऋत्विकच्या हातात कॅमेरा दिसतं असून दुसऱ्या पोस्टरवर ऋत्विक कॅमेऱ्याच्या मागे आपल्याला दिसतो आहे. ऋत्विक या सिनेमात नेमका कोणत्या भूमिकेत दिसतो याची उत्सुक्ता सर्वांनाच लागून राहिली आहे. ऋत्विक हा सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा आहे.गेल्याचवर्षी प्रदर्शित झालेला 'ड्राय डे' या सिनेमातून त्याने सिनेमातही पदार्पण केले होते. मानसीचा चित्रकार तो मालिकेतून घराघरात पाहोचलेल्या 'विहान'ने 'ड्राय डे'मध्ये  'अजय' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तरुणाईवर आधारीत हा चित्रपट होता. ऋत्विकला नाटकांचीही सिनेमा आणि मालिकांइतकीच  आवड आहे. कॉलेजमध्ये असताना ऋत्विकने अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता. बऱ्याचदा कॉलेजमध्ये रंगणारी नाटके ही गुजराती आणि इंग्रजी भाषेतील नाटकांमध्ये त्याने काम केले आहे."झुलवा" या प्रायोगिक नाटकापासून आपल्या रंगभूमीवरच्या करिअरची सुरवात केली. त्याचबरोबर  ऋत्विकने “लुक्का छुपी”, “मेरा बेटा चोर है”, “वो चार पन्ने” या हिंदी तर “गोची  शाकुंतल” या इंग्रजी तसेच  गुजराती “जयंतीलालनी सायकल” अशा विविध नाटकांमध्ये अभिनय केला आहे.