Join us

रितेशचा हा लुक नव्या प्रोजेक्टसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 16:11 IST

रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून आपल्याला नव्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचा हा लुक बँजो या चित्रपटासाठी आहे असे अनेकांना वाटत होते. बँजो या चित्रपटासाठी त्याने केस वाढवले होते.

रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून आपल्याला नव्या लुकमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचा हा लुक बँजो या चित्रपटासाठी आहे असे अनेकांना वाटत होते. बँजो या चित्रपटासाठी त्याने केस वाढवले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो आपल्या मूळ रूपात परतेल असे अनेकांना वाटत होते. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही तो याच लुकमध्ये वावरताना दिसत आहे. रितेशने त्याचा हा लुक त्याच्या आगामी चित्रपटासाठी केला असल्याचे कळतेय. छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात रितेश शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याचा हा नवा लुक असल्याचे कळतेय. तसेच माऊली या मराठी चित्रपटातही तो काम करणार आहे. पण या चित्रपटात त्याचा लुक काय असणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे कळतेय.