Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, वडील, भाऊ, नवरा यांच्या शोधात असाल तर...", रितेशसाठी जिनिलीयाची हटके पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:15 IST

जिनीलीया देशमुखने रितेशच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखचा आज वाढदिवस आहे. रितेश आज त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. रितेशच्या वाढदिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा महापूर आला आहे. अनेक कलाकारांनीही पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर जिनीलीया देशमुखनेही रितेशच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. 

जिनिलीयाने लाडक्या नवरोबाला इन्स्टाग्रामवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. तिने रितेशसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे. "जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, वडील, भाऊ, नवरा यांच्या शोधात असाल तर he is taken. आणि तो माझा आहे...हॅपी बर्थडे सुंदर माणसा", असं जिनिलीयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. जिनिलीयाच्या या पोस्टवर कमेंट करत रितेशने तिला थँक्यू म्हटलं आहे. 

रितेश आणि जिनिलीया हे सिनेसृष्टीतील लाडकं कपल असून महाराष्ट्राचे दादा-वहिनी आहेत. रितेश-जिनिलीयाने २०१२ साली लग्न केलं. त्याआधी काही वर्ष ते डेट करत होते. त्यांना दोन मुलं आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजासेलिब्रिटी