रितेश झाला केअरिंग हजबन्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 11:21 IST
आपला नवरा केअरिंग असावा त्याने आपली सतत काळजी घ्यावी असे तर प्रत्येक बायकोला वाटत असते. मग त्या बाबतीत आपली बॉलीवुडची चुलबुली गर्ल जेनेलिया मात्र नशीबवान आहे असे म्हणायला खरतर काहीच हरकत नाही. जेनेलिया अन रितेशच्या लग्नाला आता बरीच वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगा असुन जेनेलिया दुसºयांदा आई
रितेश झाला केअरिंग हजबन्ड
आपला नवरा केअरिंग असावा त्याने आपली सतत काळजी घ्यावी असे तर प्रत्येक बायकोला वाटत असते. मग त्या बाबतीत आपली बॉलीवुडची चुलबुली गर्ल जेनेलिया मात्र नशीबवान आहे असे म्हणायला खरतर काहीच हरकत नाही. जेनेलिया अन रितेशच्या लग्नाला आता बरीच वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगा असुन जेनेलिया दुसºयांदा आई होणार असल्याचे देखील आपल्याला माहित आहे. संसार हा सुरुवातीलाच गोड असतो, नव्या लग्नाचे नऊ दिवस अशा कितीतरी गोष्टी बोलल्या जातात. परंतू आपल्या या क्युट कपलच्या बाबतीत मात्र असे नाही. रितेश अजुनही जेनेलियाची तितकीच केअर करतो, असे आम्ही सांगत नाही तर चक्क एका व्हीडिओच्या माध्यामातून ही गोष्ट समोर आली आहे. सध्या जेनेलिया प्रेगनन्ट आहे आणि ती आपल्याला रितेश सोबतच सगळीकडे जाताना दिसत आहे, मग एखादी पार्टी असो किंवा कोणता फंक्शन हे दोघेही सोबतच दिसतात. एवढेच नाही तर नूकत्याच एका व्हीडीओमध्ये रितेश जेनेलियाला स्वत:च्या हाताने जेवण भरवित असल्याचे दिसत आहे. यालाच म्हणतात ना केअरिंग हजबन्ड. सिनेमांमध्ये दिसणारे हे असे रोमँटिक सीन्स जेनेलियाच्या रिअल लाईफमध्ये देखील घडत आहेत. या दोघांमधील हे प्रेम असेच फुलत जावो अशीच प्रार्थना या क्युट कपलचे फॅन्स करत असतील.