रितेश देशमुखच्या चित्रपटाचे बजेट 225 कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 16:46 IST
सध्या बाहुबली या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाची भव्यता पाहाता या चित्रपटाचे बजेट अनेक कोटींच्या घरात आहे हे ...
रितेश देशमुखच्या चित्रपटाचे बजेट 225 कोटी?
सध्या बाहुबली या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटाची भव्यता पाहाता या चित्रपटाचे बजेट अनेक कोटींच्या घरात आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. बाहुबली या चित्रपटानंतर रितेश देशमुख त्याच्या एका चित्रपटावर अनेक कोटी रुपये खर्च करत असल्याची चर्चा आहे. रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवत असून या चित्रपटात तो स्वतः शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटावर गेल्या कित्येक महिन्यांपासून रितेश काम करत आहे. या चित्रपटासाठी त्याने त्याचा लूकदेखील बदलला आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा मराठीतील सगळ्यात बिग बजेट चित्रपट असणार असल्याचे म्हटले जात आहे.आजवर कोणत्याच मराठी चित्रपटाचे बजेट 100 कोटींच्या घरात गेलेले नाही. पण शिवाजी महाराजांच्या आय़ुष्यावर रितेश चित्रपट बनवत असून या चित्रपटाचे बजेट कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. रितेशच्या चित्रपटाचे बजेट जवळजवळ 225 कोटी असल्याचे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे. रोम गोपाल वर्मा यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बाहुबलीच्या यशानंतर मी आता नुकतीच एक खूप चांगली बातमी वाचली आहे. रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत असून या चित्रपटाचे बजेट 225 पेक्षादेखील जास्त असल्याचे मी नुकतेच ऐकले आहे. बाहुबलीपेक्षा शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात अतिशय ड्रामा होता आणि ते खरे हिरो होते. त्यामुळे या चित्रपटाचा अनुभव खूपच चांगला असणार आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या चित्रपटातील युद्धाची दृश्ये खूपच चांगली असणार यात काही शंका नाही.