Rahyl Deshmukh Movie Debut: महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा 'राजा शिवाजी' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर समोर येताच प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अशातच या चित्रपटातून रितेशचा मुलगा राहिल (Rahyl Deshmukh) वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात पदार्पण करतोय.
दरम्यान, 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुखचा धाटका लेक राहील देशमुखची झलक पाहायला मिळतेय. राहिल या चित्रपटात बाल शिवाजी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याला अभिनय करताना पाहताच अनेकांनी त्याचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. ट्रेलरमध्ये राहिलचे अगदी मोजकेच संवाद आहेत. पण, त्यातूनही त्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. 'जिओ स्टुडिओज' प्रस्तुत आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Riteish Deshmukh's son, Rahil, is set to debut in the film 'Raja Shivaji,' directed by Riteish himself. Rahil will portray the role of young Shivaji Maharaj. The movie releases on May 1st, 2026, featuring a stellar cast.
Web Summary : रितेश देशमुख के बेटे राहिल, फिल्म 'राजा शिवाजी' में डेब्यू करने के लिए तैयार हैं, जिसका निर्देशन रितेश ने ही किया है। राहिल युवा शिवाजी महाराज की भूमिका निभाएंगे। यह फिल्म 1 मई, 2026 को रिलीज होगी, जिसमें कलाकारों की शानदार भूमिका है।