महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी नुकतंच आपल्या घरच्या गणपती बाप्पाला निरोप दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी इको-फ्रेंडली गणपतीची मूर्ती घरात आणली होती आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या मुलांसोबत बाप्पाचे विसर्जन केले. हा विसर्जनाचा क्षण खूपच भावूक आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. रितेशच्या मुलांनी उत्साहात बाप्पाला निरोप दिला.
जिनिलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विसर्जनाचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश गणपतीची मूर्ती हातात गोल फिरताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची दोन्ही मुले, रियान आणि राहील, 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करत आहेत. जिनिलियाने व्हिडिओसोबत 'निरोप नेहमीच हृदयद्रावक असतो,' असे कॅप्शन दिले आहे. एकूणच गणपतीला आनंदात निरोप देताना देशमुख कुटुंबाच्या मनातील भावनिक अवस्था पाहायला मिळते.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/672217371937160/}}}}
दरवर्षी, देशमुख कुटुंब पर्यावरणाची काळजी घेण्यावर भर देते. त्यांनी आपल्या घरातच एका बादलीत बाप्पाचे विसर्जन केले. हा उपक्रम त्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतीक आहे आणि इतरांनाही पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश देतो. यामुळे गणेशोत्सवाचा आनंद तर मिळतोच, पण पर्यावरणाचेही रक्षण होते. देशमुख कुटुंब यानिमित्ताने एकत्र आलेलं पाहायला मिळतं. देशमुख कुटुंबाच्या या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी देशमुख कुटुंबाच्या या निर्णयाचं आणि पर्यावरणाची काळजी घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचं खूप कौतुक केलं आहे.