Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 11:45 IST

रितेश आणि जिनिलीयाकडे पुन्हा गुडन्यूज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर आता रितेश देशमुखने मौन सोडलं आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे सिनेविश्वातील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. त्यांचे लाखो चाहते आहेत. रितेश आणि जिनिलीया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असताता. अनेकदा ते रील्सही शेअर करताना दिसतात. रितेश आणि जिनिलीयाचा पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल आहे. या व्हिडिओवरुन जिनिलीया पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

रितेशने पत्नी जिनिलीयासह मुंबईतील एका फॅशन स्टोअरच्या लाँचसाठी हजेरी लावली होती. यावेळी रितेशने पांढरा शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती. तर जिनिलीयाने निळ्या रंगाचा शॉर्ट वनपीस घातला होता. रितेश आणि जिनिलीयाने पापाराझींसमोर खास पोझही दिल्या. या पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओंमध्ये जिनिलीयाचं पोट सुटलेलं दिसत होतं. त्यावरुन रितेश आणि जिनिलीयाकडे पुन्हा गुडन्यूज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांचा हा व्हिडिओ पाहून रितेश-जिनिलीया पुन्हा आईबाबा होणार असल्याची गोड शंका चाहत्यांना आली होती.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर आता रितेश देशमुखने मौन सोडलं आहे. रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर करत याबाबत स्पष्टता दिली आहे. जिनिलीया गरोदर नसल्याचं रितेशने म्हटलं आहे. “मला आणखी दोन-तीन मुलं असण्याबद्दलही काहीच प्रॉब्लेम नाही. पण, दुर्दैवाने हे सत्य नाही,” असं म्हणत रितेशने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाने २ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती.  लग्नानंतर दोन वर्षांनी जिनिलीयाने रियान या त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर २०१६ साली ती दुसऱ्यांदा आई झाली. त्यांच्या छोट्या लेकाचं नाव राहील असं आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेता