Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश देशमुख सहकुटुंब पोहोचला अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन; Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 11:18 IST

देशमुख कुटुंब जवळपास २० मिनिटं मंदिर परिसरात होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि सर्वांची लाडकी वहिनी जिनिलिया (Genelia) यांनी काल अयोध्येत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांची दोन्ही मुलंही सोबत होती. रामनवमीच्या पावन दिनानंतर त्यांनी दर्शनाला हजेरी लावली. प्रभू श्रीरामासमोर दोघंही नतमस्तक झाले. पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी त्यांना चंदन तिलक लावला आणि आशीर्वाद दिला. देशमुख कुटुंब जवळपास २० मिनिटं मंदिर परिसरात होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन झालं. तो क्षण संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण होता. यानंतर अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी रोज हजारो लाखोंची गर्दी होत आहे. नुकतंच रितेश देशमुखनेही सहकुटुंब श्रीरामाचं दर्शन घेतलं. त्याने पत्नी आणि मुलांसह श्रीरामासमोर नतमस्तक होतानाचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्याने लिहिलं, 'मंत्रो से बढके तेरा नाम...जय श्रीराम! रामललाचं दर्शन झालं हे माझं भाग्यच. '

रितेश देशमुख शनिवारी लखनऊमधअये आयपीएल(IPL) पाहण्यासाठी गेला होता. यानंतर तो कुटुंबासोबत बाय रोड अयोध्येला पोहोचला. प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर देशमुख कुटुंब पुन्हा मुंबईत परतले.

रितेश देशमुख आणि जिनिलिया सर्वांचंच लाडकं कपल आहे. तसंच त्यांच्या मुलांवर त्यांनी केलेले संस्कार पाहून चाहत्यांना खूप कौतुक वाटतं. सोशल मीडियावर देशमुख कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. रितेश-जिनिलियाचे रील्स तर जोरदार व्हायरल होत असतात.

टॅग्स :रितेश देशमुखअयोध्याजेनेलिया डिसूजाराम मंदिर