अभिनेता रितेश देशमुखचंराजकारणाशी जवळचं नातं आहे. वडील विलासराव देशमुख हे माजी मुख्यमंत्री होते. विलासरावांना आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे. रितेशचे दोन्ही भाऊ आजही राजकारणात आहेत. रितेश राजकारणात नसला तरी अनेकदा तो राजकीय मुद्द्यांवर मत व्यक्त करताना दिसतो. आता नुकतंच त्याने राजकारणात येणार की नाही यावर उत्तर दिलं आहे.
राहुल महाजनच्या पॉडकास्टमध्ये रितेश देशमुखने हजेरी लावली होती. तेव्हा रितेश म्हणाला, " लोकांचं माझ्यावर अभिनेता म्हणून प्रेम आहे. तेच प्रेम मला इतर कोणत्या क्षेत्रात मिळेल हे गरजेचं नाही. आजपर्यंत अनेक अभिनेते नंतर राजकारणात गेले आणि त्यांनी चांगलं कामही केलं. काही असेही आहेत जे निवडणूकीत उभे राहिले पण जिंकू शकले नाहीत. मला वाटतं राजकारणासाठी वेगळ्या प्रकारची कमिटमेंट लागते. सध्या मी जे करतोय त्यात मी खूश आहे. जे केल्याने तुम्हाला आनंद मिळतो तेच आपण केलं पाहिजे असं मी नेहमीच सांगतो."
रितेश पुढे राहुल महाजनला म्हणतो, "आपण दोघांनी लहानपणापासून राजकारण खूप जवळून बघितलं आहे. अजूनही बघत आहोत. कधी शिकायची गरज नव्हती कारण घरातच राजकीय वातावरण असल्याने आपोआपच आपण ते शिकत गेलो. मी राजकारणात चांगलं काहीतरी करु शकतो असा विचार तू माझ्याबद्दल करतोय त्यासाठी आभार. पण मी असा विचार करत नाही. कारण प्रॅक्टिकली या गोष्टी करणं खूप वेगळं आहे."
"तू जर मला विचारलंस की मला राजकारण आवडतं की नाही? तर हो, मला राजकारण खूप आवडतं. मला राजकारण समजतं. आज राजकारणात काय काय गोष्टी गरजेच्या आहेत हेही मला माहित आहे. पण राजकारण सजमणं आणि प्रत्यक्षात उतरुन काम करणं यात खूप मोठं अंतर आहे. मी आज माझ्या भावांना इतकं जवळून बघत आहे जे राजकारणात आहेत. घरी जेवताना अनेक विषयांवर चर्चा होते. प्रत्येक जण आपापल्या परीने अनेक गोष्टी करतोय. वातावरण बदलतं, कधी तुम्ही सत्तेत असता तर कधी विरोधात असता हे सुरुच राहतं. पण तुम्हाला लोकांचं प्रेम मिळालंय म्हणून तुमच्यासाठी निवडणूक खूप सोपी होते असं गरजेचं नाही. कारण लोक खूप हुशार आहेत. एका अभिनेत्याकडून तुम्हाला असलेली अपेक्षा आणि एका नेत्याकडून असलेली अपेक्षा वेगळी. काहींना ते दोन्ही जमतं ही खरोखरंच वाखणण्याजोगी गोष्ट आहे. पण मला ते शक्य नाही."
Web Summary : Actor Ritesh Deshmukh, with a political family background, clarifies he enjoys and understands politics. While acknowledging its demands, he prefers his current acting career, emphasizing the difference between understanding politics and actively participating.
Web Summary : राजनीतिक पृष्ठभूमि वाले अभिनेता रितेश देशमुख ने स्पष्ट किया कि उन्हें राजनीति पसंद है और वे इसे समझते हैं। इसकी मांगों को स्वीकार करते हुए, वे अपने वर्तमान अभिनय करियर को पसंद करते हैं, राजनीति को समझने और सक्रिय रूप से भाग लेने के बीच के अंतर पर जोर देते हैं।