Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरूचे आई-वडील दुसऱ्यांदा अडकले लग्नबेडीत, थाटामाटात पार पडला सोहळा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:30 IST

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचे आई बाबा म्हणजेच आशा राजगुरू आणि महादेव राजगुरू लग्नाच्या २५ वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रिंकू राजगुरूने सैराट सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून तिला खूप लोकप्रियता मिळाली. एका रात्रीत ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान रिंकू राजगुरूच्या आई वडिलांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

रिंकू राजगुरूचे आई बाबा म्हणजेच आशा राजगुरू आणि महादेव राजगुरू लग्नाच्या २५ वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी दुसऱ्यांदादेखील थाटामाटात लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोत ते दोघे लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहेत. तसेच कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत रिंकूची आई आशा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची काही क्षणचित्रे. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 

रिंकू राजगुरू ही अकलूज येथील एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचे आई-वडील आशा आणि महादेव दोघेही शिक्षक आहेत. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच रिंकूने स्वत:ला कलाविश्वात सिद्ध केले आहे. त्यांच्यामुळे रिंकूने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 'सैराट' या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने विविध भूमिका केल्या आहेत. कागर, मेकअप, अनपॉज्ड  आणि झिम्मा २ सारख्या चित्रपटांत ती झळकली आहे. तिने मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही काम केलंय. 

टॅग्स :रिंकू राजगुरू