मराठमोळी अभिनेत्री रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) 'सैराट' सिनेमानंतर रातोरात स्टार झाली. या पहिल्याच सिनेमाने तिचं नशीबच बदललं. अगदी कमी वयात रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता या इंडस्ट्रीमध्ये तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं. आजवर रिंकूने अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे सहाजिकच तिचा चाहतावर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे. यात अनेक जण रिंकूच्या लव्हलाइफविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अशातच रिंकूनं शेअर केलेले काही फोटो चर्चेत आले.
रिंकू राजगुरु सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते. अभिनयासोबतच ती आपल्या खासगी आयुष्याचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतंच रिंकूनं फोटो शेअर केले. पण, काही वेळानंतरच तिनं ती पोस्ट हटवली. रिंकूनं एकटीने डेटवर गेल्याचं सांगत फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये ती एका कॅफेमध्ये बसलेली दिसली. "स्वतःला एकट्याने डेटवर नेणं कधीही थांबवू शकत नाही", असं तिनं कॅप्शन देत तिनं काही फोटो पोस्ट केले.
अलिकडेच रिंकूच्या इंस्टाग्रामवरील चाहत्यांच्या यादीत लक्षणीय वाढ झालीये. १ मिलियन म्हणजे १० लाख चाहते सध्या रिंकूला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत. रिंकू राजगुरु ही मूळची अकलूज (सोलापूर) जिल्ह्यातील असून ग्रामीण भागातून येऊन तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिंकू आगामी 'साडे माडे तीन'च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. तसंच तिच्या इतर प्रोजेक्ट्सकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.