Join us  

रिंकू राजगुरूने केली कागर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 6:13 AM

सैराटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचे सर्वांना ...

सैराटमधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचे सर्वांना कळलेच आहे. या चित्रपटाचे नाव कागर असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. या चित्रपटाचे नाव आणि त्याचा फाँट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आबे. या नावाच्या डिझाईनवरून या चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 'कागर' या नावाचा फाँट हा बघताक्षणी अॅग्रेसिव्ह वाटत होता. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा विषय ठरत होता. लाल कायम विजयाचा रंग आहे. हा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे की, स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे याचा अंदाज हे नाव बघून लावला जात होता. रिंकूचा हा कमबॅक चित्रपट असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला रिंकूने देखील सुरुवात केली आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्याच अकलूजमध्ये करण्यात आले.मकरंद माने दिग्दर्शित कागर या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाला. चित्रपटाला शुभेच्छा देतान मोहिते पाटील म्हणाले, 'आज अकलूजचे अनेक कलाकार चित्रपट क्षेत्रात नाव कमावत आहेत. रिंकू आणि मकरंद यांनी अकलूजचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण माळशिरस तालुक्यात होणे ही अभिमानाची बाब आहे. या क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. तरुणांनी त्याचा विचार करावा. तसंच पालकांनीही त्यांना प्रोत्साहन द्यावं.अकलूजमध्ये कागर या चित्रपटाचे चित्रीकरण होत असल्याने रिंकू राजगुरू या आपल्या गावच्या लेकीला बघायला चांगलीच गर्दी जमली होती. तिची छबी टिपण्यासाठी अनेक मोबाईल सरसावलेले होते. मुहुर्ताच्या क्लॅपनंतर लाईट कॅमेरा अॅक्शन म्हणून चित्रीत झालेला प्रसंग आणि वाजलेल्या  टाळ्या, शिट्ट्या.. असं वातावरण कागर चित्रपटाच्या सेटवर होते.रिंकूचा नवा चित्रपट म्हणून चर्चेत आलेल्य कागर या चित्रपटाची अॅक्शन सुरू झाली आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे.Also Read : रिंकू राजगुरूनंतर तिचे आई-वडील झळकणार या चित्रपटात