Join us

भैया मेरे राखी के बंधन को निभाना ! रक्षाबंधनच्या मुहूर्तावर रिंकू राजगुरुने शेअर केला भावासोबतचा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 14:02 IST

रक्षाबंधनाच्या सणाबाबत भावा-बहिणींमध्ये प्रचंड उत्साह असतो. अनेक सेलिब्रेटींनी भावंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. रिंकू राजगुरू ही याला अपवाद नाही.

 रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. रक्षाबंधनाच्या सणाबाबत भावा-बहिणींमध्ये प्रचंड उत्साह असतो. त्यामुळेच आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण हा दिवस साजरा करण्यात बिझी आहे. यात अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावंडांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. रिंकू राजगुरू ही याला अपवाद नाही. 

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीची अपडेट आर्ची तिच्या चाहत्यांना देत असते. आज रक्षाबंधनच्या दिवशी रिंकूने तिच्या भावसोबतचा फोटो इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

रिंकूने आर्ची होऊन संपूर्ण महाराष्ट्राला सैराट करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). नागराज मंजुळे यांचा सैराट गाजल्यानंतर रिंकूने कागर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा अशा कितीतरी चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम केलं.

अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू करताना तिला बॉलिवूडमधल्या अनेक उत्तम दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचं सोनं केलं. आताश: रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. लवकरच ती सुबोध भावेचा कार्यक्रम 'बस बाई बस'मध्येही हजेरी लावताना दिसणार आहे.  

टॅग्स :रिंकू राजगुरूरक्षाबंधनसेलिब्रिटी