Join us

रिंकू राजगुरू आहे मराठीतील सर्वाधिक महागडी अभिनेत्री, एका सिनेमासाठी घेते इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 12:23 IST

आर्ची आज मराठीमधील सर्वाधिक महागडी अभिनेत्री बनली आहे.

'सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. सध्या रिंकूच्या दुसऱ्या सिनेमाची प्रतीक्षा असली तरी ती कायमच आर्ची म्हणून रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवेल. मूळची अकलूजची असलेल्या रिंकूनं आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत. 

असं असलं तरी रिंकूची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. होय, आतापर्यंत फक्त बॉलिवूड कलाकारांच्याच मानधनाविषयी जास्त चर्चा व्हायची. पण आता मराठी कलाकारांच्याही मानधनाचे आकडे ऐकून सारेच थक्क होतात. मात्र या सगळ्यांमध्ये आर्चीने सध्या सा-यांचे लक्ष वेधले आहे. आर्ची आज मराठीमधील सर्वाधिक महागडी अभिनेत्री बनली आहे. 

रिंकूने आगामी ‘मेकअप’ सिनेमासाठी  तब्बल 27 लाख रुपये घेतले आहेत. सर्वच वयोगटातील रसिकांमध्ये तिची लोकप्रियता तुफान आहे. हीच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी निर्मात्यांनीही रिंकुला वाढीव मानधन देणे फायद्याचेच ठरणार असल्यामुळे सर्वाधिक मानधन देण्याचा मान आज रिंकुने मिळवला आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरू