Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा करणार एकत्र काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:59 IST

रेणुका शहाणे आणि आसुतोष राणा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून ...

रेणुका शहाणे आणि आसुतोष राणा हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. आज त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून त्यांना दोन मुले देखील आहेत. ते अनेक समारंभात एकत्र हजेरी लावताना दिसतात. रेणुका आणि आशुतोष हे दोघेही खूप चांगले कलाकार आहेत. त्यांनी दोघांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. रेणुकाने हम आपके है कौन या चित्रपटात साकारलेली पूजा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. आजही या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक केले जाते. रेणुकाने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सैलाब, इम्तिहान यांसारख्या हिंदी मालिकेतील तिच्या भूमिकांचे आजही कौतुक केले जाते. आशुतोष राणाने दुश्मन या चित्रपटात साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्याने जख्म, संघर्ष यांसारख्या चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. रेणुका ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली दिग्दर्शक आहे. रिटा या मराठी चित्रपटाचे तिने दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. रेणुका ही खूप चांगली दिग्दर्शक असल्याने तिच्यासोबत मला काम करायचे आहे असे रेणुकाचे पती आशुतोष राणाने नुकतेच सांगितले आहे. आशुतोष सांगतो, रेणुकाने दिग्दर्शित केलेल्य चित्रपटात मला काम करायचे आहे. ती एक खूप चांगली दिग्दर्शक, अभिनेत्री, लेखिका, संवाद लेखिका आहे. ती सध्या काही स्क्रिप्टवर काम करत आहे. तिने कॅमेऱ्याच्या मागे असावे आणि मला अॅक्शन, कट यांसारख्या सुचना द्याव्यात अशी माझी इच्छा आहे. ती एक कलाकार म्हणून माझ्या अभिनय क्षमतेचा योग्य वापर करून घेईल याची मला खात्री आहे. आशुतोष आणि रेणुका यांचा मोठा मुलगा शौर्यमान हा सध्या दहावीला आहे. त्याच्या परीक्षेनंतरच रेणुका आणि आशुतोष चित्रपटाचा विचार करणार असल्याचे कळतेय. तोपर्यंत तर त्यांच्या फॅन्सना त्यांच्या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.  Also Read : रेणुका शहाणे खिचडी या मालिकेत दिसणार या भूमिकेत