Join us

यंदाच्या वसंतोत्सवात रेखा भारदवाज यांची लाजवाब गायकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 14:24 IST

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे. या ...

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे. या महोत्सवाची सुरवात सुप्रसिध्द गायक पंडित व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल, तर त्यानंतर होणारं कृष्णाजी खाडिलकर लिखीत संगीत मानापमान नाटकांचं सादरीकरण हे यावर्षीच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य असणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात सिनेगायिका रेखा भारद्वाज यांच्या गायनाने होईल, तर त्यानंतर रोणू मुजुमदार आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचं एकत्रित सादरीकरण होईल.  शेवटच्या दिवशी किराणा घराण्याचे गायक आनंद भाटे यांचं गायन होईल तर महोत्सवाचा समारोप इंडियन ओशन आणि पंडित विश्वमोहन भट यांच्या फ्युजन सादरीकरणाने होईल.  यंदाच्या वसंतोत्सवमध्ये खास आकर्षण असणार आहे गायिका रेखा भारद्वाज यांचे. बॉलिवूडमध्ये आपल्या अनोख्या गायकी शैलीने प्रसिदधा असलेल्या रेखा भारदवाज यांना ऐकण्याची संधी या वसंतोत्सवमध्ये रसिकांना मिळणार आहे. आजपर्यंत अनेक विविध गाणी हिंदी चित्रपटांमध्ये रेखाजींनी गायली आहेत. त्यांच्या आवाजाची एक वेगळीच नशा गाण्यांमध्ये दिसते. ए दिल है मुश्कील या चित्रपटातील त्यांनी गायलेले गाणे चांगलेच गाजले होते. आता तर या सुप्रसिदध गायिकेला लाईव्ह ऐकण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे, त्यामुळे रेखाजींच्या चाहत्यांसाठी नक्कीच यंदाचा वसंतोत्सव खास असणार यात काही शंकाच नाही. आता त्या यावेळी कोणत्या प्रकारची गाणी सारद करणार हे मात्र समजलेले नाही. पण रेखा भारदवाज यांनी गायलेली सर्वच गाणी मंत्रमुग्ध करतात एवढे मात्र खरे.