'या' कारणामुळे तेजस्विनी पंडितने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 13:28 IST
अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आज वाढदिवस आहे. त्यानिमीत्ताने तिच्या मुंबई, ठाणे, पूणे, नाशिकमधल्या चाहत्यांनी एकत्र येऊन तिचा वाढदिवस साजरा करायचे ...
'या' कारणामुळे तेजस्विनी पंडितने चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस
अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आज वाढदिवस आहे. त्यानिमीत्ताने तिच्या मुंबई, ठाणे, पूणे, नाशिकमधल्या चाहत्यांनी एकत्र येऊन तिचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले आणि मंगळवारी रात्री सर्वांनी एकत्र येऊन तेजस्विनीचा वाढदिवस ‘ब्रिंग इन’ केला.ह्याविषयी तेजस्विनी सांगते, “दरवर्षी शूटिंग आणि कामाच्या गडबडीतच माझ्या कुटूंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा होतो. पण हा माझा पहिला वाढदिवस आहे, जो मी माझ्या चाहत्यांसोबत सेलिब्रिट केला आहे. त्यामूळे हा वाढदिवस आणि हे सेलिब्रेशन नक्कीच खास आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप टेस्टी केक आणला होता. आणि माझ्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या भूमिकांच्या फोटोंचे एक छान कोलाज असलेली फ्रेम त्यांनी मला गिफ्ट केली. एका कलाकाराला ह्यापेक्षा अधिक ते काय हवं असतं. चाहत्यांच्या ह्या प्रेमासाठीच तर आम्ही काम करतो.”मी सिंधू ताई सपकाळ, तू ही रे असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला २०१८ च उत्तरार्ध वर्ष खूप अनुकूल ठरलं आहे. २०१८ मध्ये जणू तिच्यावर हिट चित्रपटांचा वर्षाव झाला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतेच तेजस्विनी चे दोन चित्रपट प्रदर्शित झालेत. २०१७ च्या अखेरीस तेजस्विनी चा 'देवा' हा चित्रपट रिलीस झाला तर २०१८ च्या सुरुवातीस संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे ह्या दोन्ही चित्रपटांनी थिएटर हाऊसफुल केलं. प्रेक्षकांनी ह्या दोन्ही चित्रपटाला छान प्रतिसाद दिला. देवा मध्ये तेजस्विनी लेखिकेच्या भूमिकेतून दिसली. ह्या चित्रपटात पहिल्यांदाच तिने अंकुश चौधरी सोबत काम केलं आहे. चित्रपटात तिने केलेल्या अनोख्या फॅशन बद्दल देखील प्रेक्षकान मध्ये चर्चा रंगली तर 'ये रे ये रे पैसा' मध्ये तेजस्विनी बबली ही भूमिका साकारताना दिसली